(Bajarang Ban) बजरंग बाण हे हनुमानाचे अत्यंत प्रभावी आणि शक्तीशाली स्तोञ आहे. भक्ती आणि निष्ठेने याचे पठन केल्यास मनातील भीती,संकटे ,अपयश आणि वाईट शक्तींवर मात करण्याची शक्ती हे स्तोञ देते.Bajarang Ban चे पठन केल्याने हनुमानाची कृपा प्राप्त होते आणि आत्मविश्वास व मानसिक शांतता प्राप्त होते.

Table of Contents
||श्री हनुमते नमः||
श्री बजरंग बाण Bajarang Ban
दोहा
निश्चय प्रेम प्रतीति ते,विनय करैंसनमान|
तेहि के कारज सकल शुभ, सिद्ध करैं हनुमान ||
| Bajarang Ban अर्थ – दृढ निश्चय, प्रेम, विनयाने मनापासून हनुमानाची भक्ती करावी.हनुमानच तुमचे सर्व शुभ कार्य सिद्धीस नेईल. |
चौपाई
जय हनुमंत संत हितकारी|सुन लीजै प्रभु अरज हमारी||१||
| अर्थ – संतांचा हितकर्ता असणारा हनुमंत ,तुझा जय जयकार असो .प्रभु आमची प्रार्थना तू ऐकून घ्यावी. |
जन के काज विलंब न कीजै| आतुर दौरिमहासुख दीजै||२||
| अर्थ – लोकांच्या कल्याणाचे जे कार्य आहे त्याला उशीर करू नका.आतुर लोकांकडे धावत येऊन त्यांना महा सुख द्या. |
जैसे कूदि सिंधु महि पारा| सुरसा बदन पैठि बिस्तारा||३||
| Bajarang Ban अर्थ – ज्या वेळी तू समुद्रावरुन उड्डाण करून पैलतीरावर गेलास त्यावेळी सुरसा राक्षसी तोंड पसरून बसली होती. |
आगे जाई लंकिनी रोका|मारेहु लात गई सुरलोका||४||
| अर्थ – पुढे गेल्यावर तुला लंकेची देवता लंकिणीनें अडवले आणि तू तिला लाथ मारलीस व ती स्वर्गात गेली. |
जाय बिभीषन को सुख दीन्हा| सीता निरखि परमपद लीन्हा ||५||
| अर्थ – तिथून पुढे तू गेलास आणि बिभीषणाला भेटून तू आनंद दिलास. सीता माईला पाहून तू श्रेष्ठ आणि धन्य झालास. |
बाग उजारि सिंधु महँ बोरा|अति आतुर यम कातर तोरा||६||
| अर्थ – तू अशोकवनाचा विद्वान केलास,समुद्रात बुडी मारली.तुला घाबरलेला यम आर्त आणि दीन झालेला होता. |
अक्षय कुमार को मारी संहारा|लूम लपेट लंक को जारा||७||
| Bajarang Ban अर्थ – तू अक्षय कुमारला मारले आणि शेपटीच्या ज्वाळांनी लंका जाळली. |
लाह समान लंक जरि गई| जय जय ध्वनि सुरपुर महँ भई||८||
| अर्थ – लंका नगरी जाळून गेली त्यावेळी स्वर्गात पण तुझा जयजयकार झाला. |
अब विलंब केहि कारण स्वामी| कृपा करहु उर अंतरयामी||९||
| अर्थ -स्वामी आता उशीर का करता ? प्रभू तू अंतर्यामी आहेस .माझ्या हृदयात तू आहेस माझ्यावर कृपा कर. |
जय जय लछिमन प्राण के दाता| आतुर होई दुःख करहु निपाता||१०||
| Bajarang Ban अर्थ – लक्ष्मणाच्या प्राणदात्या,तुझा जय जयकार असो. माझ्या दुःखाचा निःपात कर. |
जय गिरधर जय जय सुखसागर| सुरसमूह समरथ भटनागर||११||
| अर्थ – द्रोणगिरी उचलणाऱ्या आणि सुखाच्या सागरा हनुमंता,तू देवांच्या समूहा इतकाच समर्थ योद्धा आहेस. |
ॐ हनु हनु हनु हनुमन्त हठीले|बैरिहीं मारु बज्र के किले||१२||
| अर्थ – ही हट्टी हनुमंता वैऱ्यावर वज्राचे प्रहार कर. |
गदा बज्र लै बैरिहिंमारो | महाराज प्रभु दास उबारो||१३||
| अर्थ – गदा आणि वज्राने वैऱ्याना मार.हे प्रभू या दासाला आधार दे आणि त्याचे रक्षण कर. |
ॐकार हुंकार महाबीर धावो| बज्र गदा हनु विलंब न लावो||१४||
| अर्थ – हे महावीर ॐकार आणि हुंकार करून धाव आणि वज्र आणि गदा मार.विलंब करू नकोस. |
ॐ ऱ्हिं ऱ्हिं ऱ्हिं हनुमंत कपीशा | ॐ हुं हुं हुं हनु अरि उर शीशा||१५||
| Bajarang Ban अर्थ – हे कपिराज हनुमंता शत्रुची छाती आणि मस्तक छेदून टाक. |
सत्य होहु हरि शपथ पाय के | रामदूत धरु मारू जाय के||१६||
| अर्थ – हरीची शपथ घेऊन म्हणतो हे सत्य व्हावे. रामदूताने जाऊन शत्रूला धरून मारावे. |
जय जय जय हनुमंत अगाधा| दुःख पावत जन केहि अपराधा||१७||
| अर्थ – तुझा महिमा अगम्य आणि अगाध आहे. लोकांना दुःख प्राप्त होतोय त्यात त्यांचा अपराध काय? |
पूजा जप तप नेम अचारा| नहिं जानत हौं दास तुम्हारा ||१८||
| अर्थ – जप , तप,नियम ,सदाचरण हे मला काही कळत नाही. मी तुझा दास आहे इतकेच मला कळते. |
वन उपवन मग गिरि गृह माहीं| तुम्हरे बल हम डरपत नाहीं||१९||
| अर्थ – वन ,उद्यान,मार्ग, पर्वत,घर अश्या सर्व जागी आम्हीं फक्त तुझाच बळावर निर्भय राहतो. |
पाँय परौ कर जोरि मनावौं| यहिं अवसर अब केहि गोहरावौं||२०||
| अर्थ – मी पाया पडतो ,हाथ जोडतो आणि विनवणी करतो. अशा वेळी मी कोणाला हाक मारू? |
जय अंजनीकुमार बलवंता| शंकर सुवन वीर हनुमंता||२१||
| Bajarang Ban अर्थ – अंजनीच्या सुता, बळवंता,शंकराच्या अवतारा,वीर हनुमंता तुझा विजय असो. |
बदन कराल काल कुलघातक| राम सहाय सदा प्रतिपालक||२२||
| अर्थ – तुझे स्वरूप अक्राळविक्राळ आहे. ते काळाचे कुलच नष्ट करणारे आहे. तू रामाचा सहाय्यक आहेस. तू पालनकर्ता आहेस. |
भूत प्रेत पिशाच निशाचर | अग्नि बेताल काल मारी मर||२३||
| अर्थ – भूत,प्रेत पिशाच्च,रात्री फिरणारे राक्षस ,आग्या वेताळ,महामारी ,काळ अश्या सऱ्या वाईट प्रवृत्ती. |
इन्हे मारू तोहिं शपथ राम की| राखु नाथ मरजाद नाम की||२४||
| अर्थ – त्यांना मार.तुला रामाची शपथ आहे. हे नाथ , नामाची मर्यादा राख. |
जनकसुता हरिदास कहावो|ताकी शपथ विलंब न लावो||२५||
| अर्थ – जानकी तुला हरीचा दास म्हणते तिची तुला शपथ आहे. तू उशीर करू नकोस. |
जय जय जय धुनि होत आकाश | सुमिरत होत दुःसह दुःख नाशा||२६||
| Bajarang Ban अर्थ – आकाशात तुझ्या जयजयकाराचा नाद होत आहे. तुझे स्मरण केल्यावर दुःखाचा नाश होतो. |
चरण शरण कर जोरि मनावौं| यहि अवसर अब केहि गोहरावौं||२७||
| अर्थ – तुझ्या चारणांपाशी मी शरण आलोय. हाथ जोडून मी विनंती करतो. अश्या वेळी मी कुणाला हाक मारू. |
उठु उठु चलु तोहि राम दोहाई| पाँय परौ कर जोरि मनाई||२८||
| अर्थ – ऊठ चल तुला रामाची शपथ आहे.मी पाया पडून हाथ जोडून विनंती करतो. |
ॐ चं चं चं चं चवल चलंता| ॐ हनु हनु हनु हनु हनुमंता ||२९||
| अर्थ – हनुमंत हा अतिशय चपळ आहे. चम चम चमकतो,तेजस्वी आहे. |
ॐ हं हं हाँक देत कपि चंचल| ॐ सं सं सहमि पराने खलदल ||३०||
| अर्थ – हा चपळ वानर हं हं अशी हाक देतो. सं सं हा आवाज ऐकून दुष्ट शत्रूंचे सैन्य भिऊन आपले प्राण सांभाळू लागले. |
अपने जन को तुरत उबारो | सुमिरत होय आनंद हमारो ||३१||
| अर्थ – स्वजनाना तत्काळ तू वाचवतोस. तुझे स्मरण करताच सर्व त्रास आणि क्लेश दूर होतात आणि आम्हाला आनंद होतो. |
यही बजरंग बाण जेहिं मारे| तोही कहो फिरि कोन उबारे||३२||
| अर्थ – हा बजरंग बाण ज्याला मारला जाईल त्याचे कोण रक्षण करेल? |
पाठ करै बजरंग बाण की| हनुमत रक्षा करैं प्राण की||३३||
| Bajarang Ban अर्थ – बजरंग बाणाचे पठण केल्यास हनुमंत तुमच्या प्राणांचे रक्षण करील. |
यह बजरंग बाण जो जापै| तेहि ते भूत प्रेत सब काँपे ||३४||
| अर्थ – बजरंग बाणाचे जप करणाऱ्यास सर्व भूत प्रेत भिऊन थर थर कापतील . |
धूप देय अरु जपे हमेशा| ताके तन नहिं रहे कलेशा||३५||
| जो हनुमंताच्या मूर्तीसमोर धूप लाऊन या स्तोत्राचे पठण करेल त्याच्या शरीरात कोणतेही क्लेश उरणार नाही. |
दोहा
प्रेम प्रतीतिही कपि भजै सदा धरैं उर ध्यान |तेहि के कारज सकल,शुभ सिद्ध करैं हनुमान||
| अर्थ- जो प्रेमाने हनुमंताचे भजन करील आणि हृदयात त्याचे ध्यान करील त्याची सर्व शुभ कार्य हनुमंत पूर्ण करील. |
