Hanuman Chalisa

हिंदू धर्मानुसार हनुमान चालीसा पाठ खूप प्रभावी आहे. Hanuman Chalisa पाठ ४० दिवस केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात.आजार आणि वाईट बाधा पासून मुक्ती मिळते.हनुमान चालीसा पाठ करणाऱ्यास त्याच्या प्रत्येक कार्यात यश मिळते तसेच आर्थिक अडचण दूर होतात. हनुमान चालीसा पठणाने शत्रूपासून संरक्षण मिळते,आत्मविश्वास वाढतो तसेच मनातील भीती दूर होते. हनुमान चालीसाचे पठण मंगळवार आणि शनिवारी केल्यास हनुमान प्रसन्न होतात.

Hanuman Chalisa

||श्री राम||

मनोजवं मारुततुल्यवेगं |

जितेन्द्रियं बुद्धीमत्तां वरिष्ठम्||

वातात्मजं वानरयुथमुख्यं|

श्रीरामदुतं शरणं प्रपद्ये||


अथ सार्थ श्री हनुमान चालीसा (Hanuman Chalisa)

||श्री गणेशाय नमः||

दोहा

श्रीगुरू – चरण सरोज – रज|

निज- मन -मुकुरु सुधारि |

बरनउँ रघुबर – बिमल जसु|

जो दायकु फल चारि ||१||

Hanuman Chalisa अर्थ – श्री गुरु चरणकमलातील परागांनी आपले मन स्वच्छ करून,चारी पुरुषार्थांची प्राप्ती करून देणाऱ्या श्री राम प्रभूंच्या विमल यशाचे गुणगान मी करतो आहे.

बुद्धिहीन तनु जानिके|

सुमीरौं पवनकुमार|

बल बुद्धि विद्या देहू मोहिं|

हरहु कलेश विकार ||२||

अर्थ – मी बुद्धिहीन आहे याची जाणीव असल्यामुळे मी पवनकुमार हनुमानाला प्रार्थना करतो आहे. मला शक्ती ,बुद्धी आणि विद्या द्या ,माझे सारे दुःख विकार नाहीसे करा.

चौपाई

जय हनुमान ज्ञान – गुन सागर |

जय कपीस तिहुँ लोक उजागर ||१||

अर्थ – ज्ञानाचा आणि गुणाचा सागर असलेल्या श्री हनुमानाचा विजय असो.या कपिश्रेष्ठांच्या कीर्तीने तिन्ही भुवने उजळून निघाली आहेत.

रामदूत अतुलित बलधामा |

अंजनीपुत्र पवनसुत नामा||२||

Hanuman Chalisa अर्थ- पवनसुत असे तुमचे नाव असून तुम्ही अंजनीचे पुत्र आहात. हे हनुमान तुम्ही श्री राम प्रभूंचे सेवक असून खूप बलशाली आहेत.

महाबीर, बिक्रम बजरंगी|

कुमती निवार सुमती के संगी ||३||

अर्थ – हे हनुमान तुम्ही विक्रमशाली आणि महापराक्रमी आहात .तुम्हीच वाईट वृत्तींचा नाश करून सद्बुद्धी देणारे आहेत.

कंचन बरन बिराज सुबेसा|

कानन कुंडल, कुंचित केसा||४||

Hanuman Chalisa अर्थ – त्यांची कांती सुवर्णासम असून अंगावर सुवेश शोभतो आहे. कानांमध्ये कुंडले चमकत असून मस्तकावर कुरळे केस आहेत.

हाथ बज्र और ध्वजा बिराजै |

काँधे मूँज जनेऊ साजै||५||

अर्थएका हातात गदा व दुसऱ्या हातात ध्वजा शोभत आहे. खांद्यावरून मौजी बंधन व यज्ञोपवीत रुळत आहे.

संकर सुवन केसरीनंदन

तेज प्रताप महा जग बंदन||६||

अर्थ – शंकराच्या कृपेने केसरीला पुत्राचा लाभ झाला. त्याचे तेज अपार आणि प्रताप थोर असल्यामुळे ते जगतवंद्य झाले.

बिद्यावान गुनी अति चातुर

राम काज करिबे को आतुर||७||

Hanuman Chalisa अर्थ – हा विद्यावान,गुणी,अतिशय चतुर आहे. रामाचे कार्य करण्यासाठी हा नेहमी तत्पर असतो.

प्रभू चरित्र सुनिबे को रसिया|

राम लखन सीता मन बसिया ||८||

अर्थ – हा प्रभू रामचंद्रांचे चरित्र आनंदाने ऐकतो याच्या हृदयात कायम राम , लक्ष्मण,सीता आहेत.

सूक्ष्म रूप धरि सियहिं दिखावा |

बिकट रूप धरि लंक जरावा||९||

Hanuman Chalisa अर्थ – या हनुमानाने अतिशय सूक्ष्म रूप घेऊन लंकेमध्ये जाऊन सीतेची भेट घेतली आणि नंतर विकट रूप घेऊन लंका जाळली.

भीमरूप धरि असुर सँहारे|

रामचंद्र के काज सँवारे ||१०||

अर्थ – भीमासारखे रूप धारण करून असुरांचा नाश केला आणि श्री राम यांनी सोपवलेले कार्य पूर्ण केले.

लाय संजीवन लखन जियाये|

श्री रघुबीर हरषि उर लाये ||११||

अर्थ – लक्ष्मणाला संजीवनी मुळी आणून जिवंत केले. त्यामुळे श्री राम यांना खूप आनंद झाला.

रघुपती कीन्हीं बहुत बडा़ई |

तुम मम प्रिय भरतहि सम भाई ||१२||

Hanuman Chalisa अर्थ – श्री राम हनुमान यांचे गुणगान करून म्हणाले. भरतासारखाच तू माझा प्रिय भाऊ आहेस.

सहस बदन तुम्हरो जस गावै |

अस कही श्रीपती कंठ लगावै||१३||

अर्थ – तुझे हजारो मुखांनी गुणगाण गायले जाईल.असे म्हणून श्री राम यांनी हनुमानाला जवळ घेतले.

सनकादिक ब्रम्हादि मुनीसा |

नारद सारद सहित अहीसा||१४||

जम कुबेर दिगपाल जहाँ ते |

कबि कोविद कहि सके कहाँ ते||१५||

अर्थ Hanuman Chalisa – सनकादिक मुनी ,ब्रम्हदेव ,नारद ,सरस्वती,शेष ,यम,कुबेर, दिगपाल यांसारखे श्रेष्ठ कवी सुद्धा या प्रसंगाचे वर्णन करू शकत नाहीत. तर मग माझ्यासारखा कवी काय करू शकणार.

तुम उपकार सुग्रीवहिं किन्हा |

राम मिलाय राजपद दीन्हा ||१६||

अर्थ – तुम्ही सुग्रीवाला रामांना भेटवून राज्य पदाची प्राप्ती करून देऊन सुग्रीव यांच्या वर फार मोठे उपकार केले.

तुम्हारे मंञ बिभीषन माना |

लंकेस्वर भए सब जग जाना||१७||

Hanuman Chalisa अर्थ – विभीषणाने ही तुमचे ऐकले. म्हणून ते रावणानंतर लंकाधिपती झाले. सगळ्या जगाला माहीत आहे.

जुग सहस्र जोजन पर भानू |

लील्यो ताही मधुर फल जानू||१८||

अर्थ – हजारो योजने अंतरावर असणाऱ्या सूर्याला तुम्ही एक फळ समजून त्याला पकडण्यासाठी उड्डाण केले.

प्रभु मुद्रिका मेलि मुख माहीं |

जलधि लाँघि गये अचरज नाहीं||१९||

Hanuman Chalisa अर्थ – तर मग प्रभू श्री रामाची मुद्रिका मुखात धरून एका उड्डाणात तुम्ही समुद्र पार केले यात काहीच आश्चर्य नाही.

दुर्गम काज जगत के जे ते |

सुगम अनुग्रह तुम्हारे ते ते||२०||

अर्थ – या जगामध्ये जेवढी असाध्य कार्य आहेत ती सर्व तुमच्या कृपेमुळे पार पडतात.

राम दुआरे तुम रखवारे |

होत न आज्ञा बिनु पैसारे||२१||

अर्थ – प्रभू राम चंद्राच्या राज द्वाराचे तुम्ही रखवालदार आहात. तुमच्या आज्ञेशिवाय तिथे कुणाला प्रवेश मिळत नाही.

सब सुख लहै तुम्हारी सरना|

तुम रक्षक काहू को डरना||२२||

Hanuman Chalisa अर्थ – जो कोणी तुम्हाला शरण येतो त्याला सर्व सुखांची प्राप्ती होते. तुम्ही रक्षण करणारे असल्यामुळे भीती वाटण्याचे कारणच नाही.

आपन तेज सम्हारो आपै|

तीनों लोक हाँक ते काँपै||२३||

अर्थ – आपले तेज आपली शक्ती ही फक्त आपणच आवरू शकता. आपल्या आवाजानेच या त्रिभुवनाचा थरकाप होतो.

भूत पिसाच निकट नहीं आवै|

महाबीर जब नाम सुनावै||२४||

अर्थ – महावीर हे नाव ऐकल्यावरच भूत ,पिशाच्च जवळ येत नाहीत.

नासै रोग हरै सब पीरा|

जपत निरंतर हनुमत बीरा||२५||

Hanuman Chalisa अर्थ – हनुमानाचे नाव निरंतर जपल्याने सगळे रोग आणि सगळी दुःखे नाहीशी होतात.

संकट तें हनुमान छुड़ावै|

मन क्रम बचन ध्यान जो लावै||२६||

अर्थ – जो काया,वाचा आणि मनाने हनुमानाचे ध्यान करतो त्याला हनुमान सगळ्या संकटातून मुक्त करतो.

सब पर राम तपस्वी राजा|

तीन के काज सकल तुम साजा||२७||

अर्थ – तपस्वी श्री राम हेच सृष्टीचे स्वामी आहेत. त्यांची सर्व कार्य हनुमानजी तुम्हीच करता.

और मनोरथ जो कोइ लावै |

सोई अमित जीवन फल पावै||२८||

Hanuman Chalisa अर्थ – तुमच्या कृपेने सर्वांची मनोरथ पूर्ण होतात तुमच्या कृपेने त्यांना सर्व फलांची प्राप्ती होते.

चारों जुग परताप तुम्हारा |

है परसिद्ध जगत उजियारा||२९||

अर्थ – चारी युगात तुमचा प्रताप प्रसिद्ध आहे.

साधुसंत के तुम रखवारे |

असुर निकंदन राम दुलारे||३०||

अर्थ – तुम्ही साधू संतांचे रक्षणकर्ता आहात असुरांचे शत्रू आणि श्री राम प्रभूंचे आवडते आहात.

अष्ट सिद्धि नौनिधि के दाता|

अस वर दीन जानकी माता||३१||

Hanuman Chalisa अर्थ – तुम्ही अष्ट सिद्धी आणि नवनिधीचे दाते व्हाल असा आशीर्वाद जानकी मातेने तुम्हाला दिला आहे.

राम- रसायन तुम्हरे पासा |

सदा रहो रघुपती के दासा||३२||

अर्थ – तुम्ही रघुपतीचे दास असून रामाच्या नावाचे रसायन कायम तुमच्या जवळ आहे.

तुम्हरे भजन राम को पावै|

जनम-जनम के दुख बिसरावै||३३||

अर्थ – तुमचे भजन केल्याने प्रभू रामचंद्रांची प्राप्ती होते. तुमच्या भजनानेच जन्मो जन्माची दुःखे नाहीशी होतात.

अंतकाल रघुबरपुर जाई|

जहाँ जन्म हरिभक्त कहाई||३४||

Hanuman Chalisa अर्थ – तुमचे भजन केल्याने शेवटी मनुष्य प्रभू रामचंद्रांच्या नगराला जातो आणि तेथूनच हरिभक्तीचा जन्म होतो.

और देवता चित्त न धरई|

हनुमत सेइ सर्व सुख करई||३५||

अर्थ – अनेक देवतांच्या ठिकाणी मन लावू नका फक्त हनुमानाचे भक्त व्हा सारी सुखे तुम्हाला प्राप्त होतील.

संकट कटै मिटै सब पीरा |

जो सुमिरै हनुमत बलबीरा||३६||

अर्थ- जो निरंतर हनुमानाचे स्मरण करतो त्याची सर्व संकटे नाहीशी होतील त्याच्या सगळ्या पीडा दूर होतील.

जय जय जय हनुमान गोसाईं|

कृपा करहु गुरुदेव की नाईं||३७||

अर्थ – हनुमान जी गुरुदेवांप्रमाणेच आपण आमच्यावर कृपा करा तुमचा त्रिवार जय जय कार असो.

जो शतबार पाठ कर कोई|

छूटही बंदि महा सुख होई||३८||

अर्थ – जो ही हनुमान चालीसा शंभर वेळा वाचेल त्याची सर्व बंधनातून सुटका होईल आणि त्याला महासुखाची प्राप्ती होईल.

जो यह पढ़ै हनुमान चालीसा|

होय सिद्धि साखी गौरीसा||३९||

अर्थ – जो कोणी हनुमान चालीसा नित्य पठण करेल त्याला सर्व सिद्धी प्राप्त होतील आणि त्याला गौरी शंकर साक्षी आहेत.

तुलसीदास सदा हरि चेरा|

कीजै नाथ, हृदय महँ डेरा ||४०||

Hanuman Chalisa अर्थ – कवी तुलसीदास प्रभूंचे अनन्य भक्त आहेत प्रभूंनी कायम त्यांच्या हृदयात वास करावा.

दोहा

पवन तनय संकट हरन , मंगल मूरति रुप|

राम -लखन -सीता सहित, हृदय बसहु सुर भूप||

पवन पुत्र हनुमान संकटांचे हरन करणारे असून मंगलमूर्ती सारखे रूपवान आहेत राम लक्ष्मण सीता यांच्या सह ते माझ्या हृदयात वस्ती करोत.

||इति श्री हनुमान चालीसा संपुर्णम||



Article

Bajarang Ban /बजरंग बाण संकटावर अचूक उपाय

Swami Samarth स्वामी समर्थ – संपूर्ण जीवनप्रवास

Scroll to Top