(Sant Gajanan Maharaj) महाराष्ट्र राज्यात संत परंपरेत अनेक थोर संत होऊन गेले. या संतानी त्यांच्या अद्भुत कार्याने त्यांच्या भक्तांच्या जीवनात आशा आणि श्रद्धा निर्माण केली आहे. तसेच जनसामान्यांच्या हृदयात आपले स्थान निर्माण केले. या संतांमध्येच संत गजानन महाराज हे एक अद्वितीय आणि तेजस्वी संत शेगावात होऊन गेले. शेगावातील हे योगीराज आजही त्यांच्या भक्तांच्या मनात विराजमान आहेत.गजानन महाराज हे फक्त एक संत नसून दीनदुबळ्यांचे कैवारी, मार्गदर्शक आणि आधार होते. त्यांचे जीवन म्हणजे एक चमत्कारी आणि रहस्यमय प्रवासच होता.

Table of Contents
Sant Gajanan Maharaj यांचा जन्म
गजानन महाराजांचा जन्म हा नेमका कधी झाला त्यांचे बालपण कुठे गेले हे अजूनही एक गूढ आहे.त्यांच्या जन्माची तारीख आणि ठिकाण ही कुणालाच माहिती नाही. संत गजानन महाराज हे सर्व प्रथम १८७८ मध्ये शेगाव मध्ये दिसले. बंकटलाल अगरवाल यांना त्यावेळी ते कचऱ्याच्या ढिगाऱ्यावर उष्ट्या पत्रावळीतील अन्न खाताना दिसले. त्यावेळी त्यांना त्यांचे तेजस्वी रूप पाहून बंकटलाल यांना आश्चर्य वाटले आणि त्यांनी त्यांना त्यांच्या घरी नेले.त्याच दिवसानंतर गजानन महाराज शेगाव मध्ये वास्तव्यास आले आणि त्यांच्या चमत्काराची वार्ता सर्व दूर पसरू लागली.
साधे आणि तेजस्वी व्यक्तिमत्व
Sant Gajanan Maharaj हे अत्यंत साधे आणि आकर्षक व्यक्तीमत्वाचे होते. ते जगाच्या असणाऱ्या बंधनातून पूर्ण मुक्त असायचे. त्यांचे डोळे हे अत्यंत तेजस्वी तसेच शांत होते. त्यांचे बोलणे अत्यंत सोपे आणि थेट असायचे.त्यांच्या चेहऱ्यावर नेहमी शांत आणि समाधानी भाव असे.
गजानन महाराजांचे अलौकिक चमत्कार
Sant Gajanan Maharaj यांचे आयुष्य हे अनेक प्रकारच्या चमत्काराणी भरलेले होते. गजानन महाराजांच्या स्पर्शाने तसेच दर्शनाने अनेक लोकांचे रोग बरे झाले तसेच अनेक लोकांना आलेल्या अडचणीतून लोकांची सुटका झाली.त्यांनी पाण्या तरंगणाऱ्या पादुका दाखवल्या,एका गरीब शेतकऱ्याच्या शेतात अचानक पाणी आणलं,अशा अनेक कथा लोकांकडून ऐकायला मिळतात.
गजानन विजयग्रंथ नुसार महाराजांनी केलेले चमत्कार
- जानराव देशमुख याला जीवदान दिले.
- सोनाराने विस्तव देण्यास नकार दिल्यानंतर विना विस्तवाची चिलीम पेटविली.
- पाणी देण्यास नकार दिल्यानंतर कोरड्या विहिरीला चमत्काराने पाण्याने भरले.
- त्यांनी हाताने ऊसाचा रस काढला.
- भरपूर मधमाश्या चावूनही जखमा आपोआप बऱ्या करून दाखवल्या.
- कुष्ठरोग्याला बरे केले.
शिकवण आणि उपदेश
Sant Gajanan Maharaj यांनी प्रेम , करुणा आणि निःस्वार्थ सेवेचा संदेश भक्तांना दिला आहे. गजानन महाराजांची शिकवण अत्यंत साधी आणि सरळ आहे.त्यांनी जात,धर्म,लिंग असा कोणताही भेदभाव केला नाही . महाराजांनी त्यांच्या भक्तांना सदैव कर्मयोगाचे महत्व पटवून दिले. गजानन महाराजांनी अंध श्रद्धेचे खंडन केले आहे आणि लोकांना तर्कशुद्ध विचार करण्याचे उपदेश केले आहेत. त्यांनी कधीच मोठेपणा किंवा लाभ मिळवण्यासाठी चमत्काराचा वापर केला नाही.
Sant Gajanan Maharaj यांचे भक्त आणि अनुयायी
महाराजांचे भक्त हे संपूर्ण देशभरात आहेत. आजही लाखो लोक त्यांच्या दर्शनासाठी शेगाव मध्ये येत असतात. शेगाव हे एक तीर्थक्षेत्र आहे जिथे महाराजांचे समाधी मंदिर आहे.
लोकमान्य टिळकांना आशीर्वाद दिला
शिवजयंतीच्या उत्सवात जेव्हा लोकमान्य टिळकांनी इंग्रज सरकार विरोधात भाषण केले तेव्हा गजानन महाराजही व्यासपीठावर होते.त्यावेळी त्यांनी भविष्यवाणी केली की या भाषणामुळे इंग्रज सरकारकडून लोकमान्य टिळकांना कठोर शिक्षा होणार. ही भविष्यवाणी खरी ठरली. याबरोबरच महाराज लोकमान्य टिळकांकडून ग्रंथ लिहिला जाणार ही भविष्यवाणी ही केली होती. पुढे लोकमान्य टिळकांनी श्रीमद भगवद् गीता रहस्य हा ग्रंथ लिहिला.
गांजा आणि भक्ताचा नवस
कधी मधील महाराजांच्या एका भक्ताने त्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी महाराजांना गांजा देण्याचा नवस बोलला. पुढे त्याची इच्छा पूर्ण झाल्यानंतर तो शेगावात गांजा घेऊन आला.पण इतक्या सर्व माणसांच्यासमोर महाराजांना गांजा देण्यास तो मनुष्य घाबरला. महाराजांना तो भक्त दिसल्यावर त्यांनी त्याला बोलावले आणि महाराज म्हणाले नवस बोलताना तुला लाज वाटली नाही आणि नवसपूर करताना का तू लाजतोस. पुढे महाराज तो गांजा स्वीकारला कारण महाराजांना त्यांच्या भक्तांचे मन मोडणे जमत नसे.
समाधी
Sant Gajanan Maharaj यांनी ८ सप्टेंबर १९१० रोजी शेगाव येथे समाधी घेतली. शेगाव येथे त्यांचे समाधी मंदिर आहे. त्यांनी त्यांच्या समाधी ची भविष्यवाणी अगोदरच केली होती. ह्या मंदिराचे बांधकाम हे गजानन महाराजांनी समाधी घ्यायच्या आधीच सुरू केले होते. गजानन महाराजांची समाधी ही प्रभू श्रीरामांच्या मंदिराखालीच आहे.