Shree Maruti Stotra हिंदू धर्मातील अतिशय प्रभावी स्तोत्र आहे.आयुष्यात येणाऱ्या अडचणींवर मात करण्यासाठी,मनोबल वाढवण्यासाठी हनुमान चालीसाचे नित्य पठण करावे.हनुमान चालीसाचे नित्य पठण केल्याने आयुष्यातील नकारात्मकता दूर होऊन सकारात्मक बदल घडतील. Shree Maruti Stotra याला हनुमान स्तोत्र असेही म्हंटले जाते. या स्तोत्रामध्ये हनुमानाच्या ११ रूपांचे वर्णन केलेले आहे.याच्या प्रत्येक श्लोकामध्ये हनुमानाच्या पराक्रमी,बुद्धिमान,भक्त आणि रक्षक अशा विविध रूपांचे वर्णन केलेले आहे.

Table of Contents
||श्री हनुमान स्तोत्र ||
भीमरुपी महारुद्रा| वज्र हनुमान मारुती | वनारी अंजनीसुता| रामदूता प्रभंजना||१||
महाबळी प्राणदाता | सकळां उठवी बळे| सौख्यकारी दुःखहारी| दूत वैष्णव गायका||२||
दिनानाथा हरिरूपा| सुंदरा जगदंतरा|पातालदेवता हंता| भव्य सिंदूरलेपना ||३||
लोकनाथा जगन्नाथा| प्राणनाथा पुरातना| पुण्यवंता पुण्यशीला| पावना परितोषका||४||
ध्वजांगे उचली बाहो| आवेशे लोटला पुढे|काळाग्नी काळरुद्रग्नी| देखतां कापती भये ||५||
ब्रह्मांडे माईली नेणो| आवळे दंत पंगती| नेत्रग्नी चालिल्या ज्वाळा| भ्रुकुटी ताठिल्या बळे ||६||
पुच्छ ते मुरडिले माथा| किरिटी कुंडले बरी | सुवर्णकटिकांसोटी| घंटा किंकिणी नागरा||७||
ठाकरे पर्वता ऐसा| नेटका सडपातळू | चपळांग पाहता मोठे | महा विद्युल्लतेपरी||८||
कोटिच्या कोटि उड्डाणे| झेपावे उत्तरेकडे| मंदाद्री सारिखा द्रोणू| क्रोधे उत्पटीला बळे||९||
आणिला मागुती नेला | आला गेला मनोगती| मनासी टाकीले मागे | गतीसी तुळणा नसे ||१०||
अणूपासोनि ब्रह्मांडा एवढा| होत जातसे|तयासी तुळणा कोठे | मेरू मांदार धाकुटे||११||
ब्रम्हांडाभोवते वेढे| वज्रपुच्छे करु शके| तयासी तुळणा कैची | ब्रम्हांडी पाहता नसे ||१२||
आरक्त देखिले डोळा| ग्रासिले सूर्यमंडळा|वाढतां वाढताना वाढे | भेदिले शुन्य मंडळा||१३||
धनधान्य पशुवृद्धी | पुत्रपौत्र समग्रही| पावती रूपविद्यादि | स्तोत्र पाठे करुनिया||१४||
भूतप्रेत समंधादि| रोगव्याधी समस्तही| नासती तुटती चिंता | आनंदे भीमदर्शने||१५||
हे धरा पंधरा श्लोकी| लाभली शोभली बरी| दृढदेहो निसंदेहो| संख्या चंद्रकळा गुणे||१६||
रामदासी अग्रगणु| कपिकुळासि मंडणु| रामरुपी अंतरात्मा| दर्शने दोष शास्ती||१७||
||इति रामदाकृत संकट निरसन मारुती स्तोत्रं संपूर्णम्||
||श्री सीता रामचंद्रार्पणमस्तु||
Shree Maruti Stotra इतिहास
श्री समर्थ रामदास स्वामी यांनी हनुमान चालीसा रचली . त्यांनी महाराष्ट्रात मारुतीची अनेक मंदिरे बांधली.या स्तोत्राच्या पठणाने लोकांना बाळ,प्रेरणा आणि आत्मविश्वास मिळतो.
Shree Maruti Stotra पठाणाचे फायदे
Shree maruti Stotra पठण नित्य केल्याने फायदे होतात ते खालीलप्रमाणे,
- नियमित हनुमान चालीसाचे पठाण केल्याने त्याचा मेडीटेशन सारखा प्रभाव होतो.
- श्वासावर नियंत्रण तसेच ऑक्सिजनचा प्रभावी वापर होतो.
- शत्रूंवर विजय मिळतो –
- भूतप्रेत बाधांपासून संरक्षण मिळते
- शारीरिक तसेच मानसिक बळ मिळते
- नकारात्मक ऊर्जा दूर होते
- विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त
Shree Maruti Stotra पठण कधी करावे
- श्री मारुती स्तोत्र हे सकाळी स्नान केल्यानंतर आणि संध्याकाळी दीपप्रज्वलानंतर म्हणावे
- मंगळवारी आणि शनिवारी श्री मारुती स्तोत्राचे पठण करणे हे खूप प्रभावी मानले जाते.
- श्री मारुतीस्तोत्राचे पठण करताना समोर हनुमानाची मूर्ती किंवा प्रतिमा ठेवावी.
निष्कर्ष
Shree Maruti Stotra हे फक्त धार्मिक नाही तर मानसिक ,भावनिक आणि आध्यात्मिक आरोग्यासाठी उपयुक्त आहे. दिवसाची सुरुवात ह्या शक्तिशाली मंत्राने करावी आणि हनुमंताचा आशीर्वाद मिळावा.