Swami Samarth स्वामी समर्थ – संपूर्ण जीवनप्रवास

(Swami Samarth) स्वामी समर्थ हे महाराष्ट्र राज्यातील थोर आणि आदरणीय संत आहेत. त्यांनी कायमच समाजाच्या उद्धारासाठी कार्य केले. असे मानले जाते की ते दत्तात्रेयांचे चौथे अवतार आहेत. त्यांनी आयुष्यभर त्यांच्या भक्तांना अध्यात्माचे मार्गदर्शन केले. स्वामी समर्थ यांनी भारतातील विविध ठिकाणी भ्रमंती करून महाराष्ट्रातील अक्कलकोट या स्थानी ते स्थायिक झाले. ते एकूण २२ वर्ष अक्कलकोट येथे वास्तव्यास होते. त्यांचा जीवनप्रवास खालीलप्रमाणे,

Swami Samarth

सुरुवात (Swami Samarth)

तशी स्वामी समर्थांच्या जन्माबद्दल निश्चित माहिती उपलब्ध नसली तरी स्वामींनी स्वतःच सांगितले आहे की त्यांनी वटवृक्षाच्या पोटी जन्म घेतलेला आहे. त्यांनी सांगितल्याप्रमाणे त्यांचा जन्म हा कर्दळी वनात जे आंध्र प्रदेशातील श्रीशैलम या ठिकाणी झाला आहे. त्यांनी भारतातील विविध ठिकाणे जस की पुरी,वाराणसी,हरिद्वार,गिरनार, काठीयावार,रामेश्वरम अश्या विविध ठिकाणी प्रवास करून प्रथम पंढरपूर तालुक्यातील मंगळवेढा आणि नंतर सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट येथे स्थायिक झाले.

Swami Samarth यांचा अक्कलकोट येथील प्रवेश

स्वामी समर्थ हे साधारण १८५६ मध्ये अक्कलकोट येथे आले. स्वामी अक्कलकोट येथे तब्बल २२ वर्ष वास्तव्यास असताना त्यांनी त्यांच्या भक्तांना मार्गदर्शन करत त्यांची आध्यात्मिक उन्नती केली. स्वामी समर्थांनी अक्कलकोट येथील खंडोबा मंदिरात सर्व प्रथम चमत्कार दाखवला त्यांनी त्यांची चेष्टा करणाऱ्या फकिराला रिकाम्या चिलीमीमधून आग आणि धूर काढून दाखविला.

Swami Samarth यांचे कार्य

स्वामी समर्थ यांनी सामाजिक तसेच अध्यात्मिक उन्नतीसाठी कार्य केले आहे. त्यांनी अक्कलकोट मध्ये त्यांच्या चमत्काराच्या तसेच उपदेशांच्या सहाय्यानं येथील जनतेला मार्गदर्शन केले आहे.

  • अध्यात्माच्या सहाय्यानं मार्गदर्शन
    • स्वामींनी त्यांच्या अनेक भक्तांना त्यांच्या वैयक्तिक संकटातून मार्ग काढण्यासाठी आध्यात्मिक आधार दिला.
    • त्यांनी “भिऊ नकोस ,मी तुझ्या पाठीशी आहे” या वाक्याने लोकांच्या मनात आत्मविश्वास आणि श्रद्धा जागवली.
  • भक्तांच्या समस्यांचे निरसन
    • स्वामी समर्थ हे त्यांच्या चमत्काराने येणाऱ्या भक्तांचे रोग, दुःख,संकटे,भूतबाधा यांचा उपय करत असत.
    • त्यांनी भक्तांच्या मनातील भीती,संकटे दूर केली आणि भक्तांना शांती,समाधान,दिशा प्रदान केली.
  • सर्वसामान्य जनतेला जवळ करणारा संत.
    • स्वामी समर्थ हे सर्व प्रकारच्या जाती/धर्माच्या लोकांना जवळ करत असत. त्यांनी त्यांच्या सर्व कृतीतून समता आणि सहिष्णूता आदर्श ठेवला.
  • संस्थात्मक कार्य
    • स्वामी समर्थांच्या कृपेने अक्कलकोट मध्ये त्यांच्या नावाने मठ आणि मंदिराची स्थापना करण्यात आली आहे. त्या ठिकाणी आजही लाखो भक्त संपूर्ण महाराष्ट्रामधून स्वामींच्या दर्शनासाठी येतात.

Swami Samarth यांचे प्रमुख उपदेश

“भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे”

  • तुमच्या जीवनात संकटे ही येत असतात ,पण तुमची स्वामींवर विश्वास आणि श्रद्धा असेल तर स्वामी हे तुमच्या सदैव पाठीशी उभे असतील आणि तुम्हाला या संकटातून मार्ग दाखवतील.
  • स्वामींचा हा उपदेश त्यांच्या भक्तांना आत्मविश्वास तसेच आधार देतो.

ईश्वर भक्तीत खरे समाधान

  • या लोकिच्या सर्व सुखांपेक्षा ईश्वराची भक्ती ही सर्वात श्रेष्ठ आहे.
  • लोकांच्या जीवनात येणाऱ्या दुःख आणि चिंतांवर ईश्वराच्या चरणी समर्पण हाच उपाय आहे.

कर्मावर विश्वास ठेवा

  • आपण जे पाप किंवा पुण्य करतो त्याचे फळ हे आपल्यालाच भोगावे लागते.
  • लोकांनी फळाची चिंता न करता स्वतःचे कार्य करत रहावे.

सेवा करत असताना जात पात पाहू नये

  • प्रत्येक माणसात देव आहे.त्यामुळे माणसांनी भेदभाव करू नये.
  • स्वामी समर्थांनी समतेचा संदेश दिला.

मठ आणि संस्थान

  • Swami Samarth महाराजांच्या कार्याच्या प्रसारासाठी विविध ठिकाणी अनेक मठ आणि संस्थान स्थापन झाले आहेत.
  • अक्कलकोट, दिंडोरी,पुणे,मुंबई आणि इतर खूप ठिकाणांवर स्वामी समर्थ महाराजांच्या मठाची स्थापना झालेली आहे.
  • या स्थापन झालेल्या मठांमध्ये भक्तांना पूजा,उपासना,शिक्षण आणि सेवा यांची सुविधा उपलब्ध आहे.

श्री Swami Samarth चरित्र सरामृत

स्वामी समर्थ महाराजांचे चरित्र आणि माहिती ही “श्री स्वामी समर्थ सारामृतात” खूप छान प्रकारे सांगितली आहे. यामध्ये त्यांच्या जीवनातील घटना, चमत्कार आणि उपदेश यांचे वर्णन केले आहे. ह्या सारामृत मध्ये एकूण २१ अध्याय असून प्रत्येक अध्याया मध्ये स्वामींच्या जीवनातील विविध पैलू सांगितलेले आहेत.

Swami Samarth समाधी

स्वामी समर्थांनी ३० एप्रिल १८७८ मध्ये समाधी घेतली. त्यांच्या समाधीस्थळावर अक्कलकोट येथे एक भव्य मंदिर उभारले आहे.


Articles

Hanuman Chalisa

Bajarang Ban /बजरंग बाण संकटावर अचूक उपाय

स्वामी समर्थ

Scroll to Top